मुंबई, दि. १२ ऑगस्ट : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी केली होती. पार्थ पवारांच्या या मागणीवर माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे. मी त्यांना 50 वर्षांपासून ओळखतो. पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं पवार म्हणाले.महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास असून सुशांत आत्महत्येच्या सीबीआय चौकशीला माझा विरोध असण्याचं काय कारण, मी या चौकशीला विरोध करणार नाही, अशी रोखठोक भूमिका शरद पवार यांनी मांडली.सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशी प्रकरणावर शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. या प्रश्नांना शरद पवार यांनी अगदी निर्भीड उत्तरं दिली. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडली.एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही. असे त्यांनी सांगितले.