IMG-LOGO
COVID-19

देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ नवीन रुग्णांची नोंद, ८७१ जणांचा मृत्यू

Tuesday, Aug 11
IMG

देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजनूच गडद होत आहे.

नवी दिल्ली, दि. ११ ऑगस्ट : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजनूच गडद होत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ५३ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत १५,८३,४९० रुग्ण बरे झाले असून  तर ४५ हजार २५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के इतके आहे.

Share: