एलआयसी भरती परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची भाषा सक्तीच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. 'इतरांची भाषा, संस्कृती डावलण्याचा उत्तर भारतीयांचा डाव आहे. पण महाराष्ट्रात आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील,' असा इशारा मनसेनं दिला आहे.
LIC भरती परीक्षेतील हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध.."एलआयसी वर मनसेची धडक'एलआयसी भरती परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची भाषा सक्तीच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. 'इतरांची भाषा, संस्कृती डावलण्याचा उत्तर भारतीयांचा डाव आहे. पण महाराष्ट्रात आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील,' असा इशारा मनसेनं दिला आहे.भारतीय आयुर्विमा महामंड्ळात (LIC) ने जाहीर केलेल्या तृतीय श्रेणी (असिस्टंट) भरतीच्या भरतीपूर्व लेखी परिक्षेत हिंदी भाषेची सक्ती रद्द करा या मागणी साठी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या सूचनेननुसार मनसे उपाध्यक्ष अरविंद गावडे,चेतन पेडणेकर, मनसे विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस जगदीश राऊत,श्रीया कदम, पराग नाचणे, विभाग अध्यक्ष शेखर गव्हाणे ,वैभव शिंदे,निलेश जाधव,राजू पटेल,रोहन हुमने,भरमु भामरेकर यांच्या शिष्टमंडळाने एलआयसीचे अधिकारी जी.एस.वनवार यांची भेट घेऊन एलआयसी ने हिंदी भाषेची सक्ती रद्द करून मुख्य परीक्षा पहिल्या चार निकर्षावर घ्यावी तसेच भाषेची सक्ती करावयाची असल्यास मराठी भाषेची परीक्षा घ्यावी व स्थानिक भूमिपूत्रांना या भर्तीत प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली.मनसेच्या मागणीनंतर दुसरी परिक्षा ही मराठीत घेण्यात यईल व त्याचे आयोजन एलआयसी च्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.