IMG-LOGO
महाराष्ट्र

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड

Tuesday, Aug 11
IMG

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

अमरावती, दि.११ ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं.

Share: