IMG-LOGO
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी येत्या काळात अधिक भक्कम होईल

Saturday, Oct 26
IMG

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली असून आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणात याच ताकदीने उभी राहील, असा विश्वास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली असून आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणात याच ताकदीने उभी राहील, असा विश्वास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव कमी जाणवल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया आली असून आंबेडकर यांनी राज्यातील सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. विधानसभा निवडणुकीत आमच्या आघाडीने चांगली लढत दिली. आमच्या आघाडीला २४ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. आमचे उमेदवार जिंकू शकले नाहीत मात्र १० जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली. काही ठिकाणी आमचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत, असे नमूद करत वंचित बहुजन आघाडी येत्या काळात अधिक भक्कम होईल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडी ही संघर्षातून उभी राहिलेली आघाडी आहे. आजवर आपण जसे लढलो त्याचप्रमाणे यापुढेही वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी आपण पूर्ण ताकदीने लढत राहू. राज्याच्या राजकारणात त्याच ताकदीने आपल्याला उभे राहायचे असून जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक, राजकीय न्याय आणि हक्कांसाठी आपण लढत राहू, असा निर्धार आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Share: