नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने शुक्रवारी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन'साजरा केला गेला. आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा'दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना राबवली जात आहे.
निमाकडून 'राष्ट्रीय आयुर्वेद दिना’ साजराधन्वंतरी पुजनासोबतच जेष्ठांचा केला सत्कार नाशिक : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने शुक्रवारी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन'साजरा केला गेला. आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा'दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना राबवली जात आहे. देशातील आयुर्वेद व युनानी या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या व्यवसाइकांची एनआयएमए अर्थात निमा सर्वोच्च संघटना आहे. या संघटनेमार्फत वैद्यकिय व्यवसाईकांचे हित संरक्षण करणे, न्यायवैद्यकिय प्रकरणात सहकार्य देणे यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य शिबिरे, मोफत औषध वाटप, प्रबोधनपर कार्यक्रम, विविध चर्चासत्रे, प्रदर्शन आदी कार्यक्रम राबविते. यंदा निमाकडून अनोख्या पद्धतीने श्री धन्वंतरी जयंती साजरी केली गेली. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अजुनही रुग्णसेवेत आहेत अशा सन्माननीय सद्यस्यांचा सत्कार करण्यात आला. सोबत सदस्यांच्या पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नेत्रदिपक योगदानासाठी सत्कार केला गेला. यावेळी डॉ. मोहन टेंभे, डॉ. दत्तात्रय कोचे, डॉ. निलांबरी शुक्ल, डॉ. मंगला लढ्ढा, डॉ. शरद पाटील, डॉ. सुभाष गोसावी, डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. बी. आर. दायमा, डॉ. वसंत कविश्वर, डॉ. जयराम खोडे आणि डॉ. श्री व सौ. माणिक कळमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निमा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याप्रसंगी निमा नाशिक,विमेन्स फोरम व स्टुडंट फोरमचे वार्षिक अहवाल सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव डॉ. वैभव दातरंगे यांनी केले. यावेळी अध्यक्षा डॉ. जयश्री सुर्यवंशी , खजिनदार डाॅ. प्रतिभा वाघ, संघटक डाॅ मनिषा हिरे, केंद्रिय सहखजिनदार डॉ. शैलेश निकम,राज्य खजिनदार डॉ. भुषण वाणी, डॉ. अनिल निकम, डाॅ तुषार सूर्यवंशी, डाॅ देवेंद्र बच्छाव, डाॅ. राहुल पगार, डाॅ श्रुती कुलकर्णी, डाॅ प्रणिता गुजराथी,डाॅ दिप्ती बडे, डाॅ स्नेहल निकम, डाॅ सोनल पाटील तसेच शाखेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.