नाशिकरांनी २७ चित्रे व शिल्पे साकारतांना अनुभवली नाशिक : पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व नाशिक आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य न्यास व संस्कार भारती नाशिक यांच्या विशेष सहकार्याने प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ बुधवार, २ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रत्यक्ष व्यक्ती चित्र/ शिल्प स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते, सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक युवा चित्रकारांनी व शिल्पकारांनी सहभाग नोंदवला होता त्यातील निवडक २३ चित्रकार व ५ शिल्पकार यांचे प्रत्यक्ष व्यक्तीचित्र व शिल्प स्पर्धा कुर्तकोटी सभागृह , जुना गंगापूर नाका, नाशिक येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये मोठया उत्साहात संपन्न झाली, सदर स्पर्धा राष्ट्रीय पातळी ची असून त्याच्या अंतिम फेरी निवडी साठीची ही दुसरी फेरी स्पर्धकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती,
नाशिकरांनी २७ चित्रे व शिल्पे साकारतांना अनुभवली नाशिक : पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व नाशिक आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य न्यास व संस्कार भारती नाशिक यांच्या विशेष सहकार्याने प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ बुधवार, २ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रत्यक्ष व्यक्ती चित्र/ शिल्प स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते, सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक युवा चित्रकारांनी व शिल्पकारांनी सहभाग नोंदवला होता त्यातील निवडक २३ चित्रकार व ५ शिल्पकार यांचे प्रत्यक्ष व्यक्तीचित्र व शिल्प स्पर्धा कुर्तकोटी सभागृह , जुना गंगापूर नाका, नाशिक येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये मोठया उत्साहात संपन्न झाली, सदर स्पर्धा राष्ट्रीय पातळी ची असून त्याच्या अंतिम फेरी निवडी साठीची ही दुसरी फेरी स्पर्धकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती, सदर अंतिम स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या चित्रकार व शिल्पकारांना पंचाहत्तर हजार रुपयाचे चित्रकार वासुदेव कामत PGS ग्रॅण्ड ट्रॉफी तसेच रुपये पन्नास हजार चे फर्स्ट रनरअप पारितोषिक व रुपये पंचवीस चे सेकंड रनरअप यासोबत उर्वरित नऊ स्पर्धकांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रुपये पंधरा हजार रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत,सदर लाईव्ह चित्र-शिल्प स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककर मोठया संख्येने उपस्थित होते, जलरंग, तैल रंग, पेन्सिल, बॉलपेन या सर्व माध्यमात व्यक्तिचित्रे साकारण्यात आली होती, स्पर्धा संपल्यानंतर त्याठिकाणी नाशिकच्या प्राध्यापिका संध्या केळकर यांचे जगप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व स्लाईड शो चे विशेष आयोजन ही नाशिककरांसह स्पर्धकांसाठी आयोजकांकडून करण्यात आले होते, एकाच दिवशी सत्तावीस चित्र, शिल्प साकरतांना पाहण्याची कलात्मक आस्वादाची नाशिककरांना एकवेगळी अनुभूती देऊन गेली, नाशिक सह बोरिवली, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सह वाराणसी, गोवा, चंदीगड ह्या ठिकाणी ही एकाच दिवशी सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते,नाशिक मधील ह्या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रकार ,कवी चारुदत्त कुलकर्णी तर आभार प्रदर्शन चित्रकार राजेश सावंत यांनी केले, सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नाशिक आर्ट फाउंडेशन चे सदस्य सचिन पाटील, श्रीकांत नागरे, दीपाली नागरे, नितीन बिलदीकर, किरण पाटील, मनोज जोशी, मिलिंद वाळेकर, धनंजय गोवर्धने , सुनील महामुनी आदी चे सहकार्य लाभले.