राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे, सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून ईव्हीएम बरोबरच आता 43 लाख बोगस मतदार तयार केले असून या कामात सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला,
राज्यात 43 लाख बोगस मतदारप्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोपराज्यात विधानसभेच्या निवडणूका होत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे, सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून ईव्हीएम बरोबरच आता 43 लाख बोगस मतदार तयार केले असून या कामात सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला, मुंबईत आंबेडकर भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांनी सांगितले की राज्यातील प्रत्येक मतदाराला इपिक नंबर दिला जातो, तो नंबर दुसऱ्या कुठल्याही मतदाराला नसतो, असे असताना ही राज्यात 43 लाख बोगस मतदार तयार करण्यात आले असून त्यांची नोंदणी देखील झाली आहे, एकाच इपिक नंबरवर दोन मतदार दाखविण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला असून निवडणूक आयोगाने या कामी मदत केली असल्याचे ही त्यांनी सांगितले ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे .