देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
नवी दिल्ली, दि. १० ऑगस्ट : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे दिली असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही वेगळ्या कारणांसाठी प्रणब मुखर्जी हे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ट्विटरवरून याची माहिती देताना त्यांनी आठवडाभरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केले आहे. ८४ वर्षीय प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.