नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभाग घेतला असून गावागावातून मतदानाचा जागर होत आहे.
नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभाग घेतला असून गावागावातून मतदानाचा जागर होत आहे.रॅली, स्पर्धा, पथनाट्य आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. अक्कलकुवा-धडगावच्या दुर्गम भागातील शाळांनीदेखील उत्साहाने विविध उपक्रम राबविले आहेत. नेमसुशिल श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे मानवी श्रृंखला तयार करून मतदानाचा संदेश देण्यात आला. प्रा.भाईसाहेब गो.हु.महाजन हायस्कुल आणि शि.ल.माळी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर व भाईसाहेब जी.एच.महाजन इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानवी श्रृंखलेनेदेखील मतदारांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली.विद्यार्थ्यांसोबत शिक्षकदेखील उत्साहाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांकडून राबविलेले कल्पक उपक्रम मतदारांना प्रोत्साहीत करणारे ठरत आहेत. मतदार जागृतीसाठी प्रत्येक गाव आणि पाड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, सहा. शिक्षण उपनिरिक्षक दिनेश देवरे हे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.