खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील हे आघाडीवर आहे.
खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत ८३ हजार मतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील हे ४ लाख ८२ हजार ९४७ मते मिळवून विजयी झाले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना चांगलीच टक्कर दिली होती. परिणामी त्यांचे मताधिक्य घटले होते. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भागात प्रचाराची चांगली आघाडी घेतली होती. भर पावसात त्यांनी केलेल्या भाषणानंतर सोशल मिडियावर भावूक लाट उसळली होती. त्यामुळे ही लाट मतांत परिवर्तित होऊन उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला.