IMG-LOGO
महाराष्ट्र

शरद पवारांच्या झंझावातानं वातावरण फिरलं; राष्ट्रवादीला तारलं

Thursday, Oct 24
IMG

केंद्रातील भाजपाच्या लाटेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेकांनी पक्ष सोडला. सर्वजण राष्ट्रवादी आणि शरद पवार संपले असेच म्हणत होते, मात्र ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेल्या शरद पवार यांनी करून दाखविले.

केंद्रातील भाजपाच्या लाटेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेकांनी पक्ष सोडला. सर्वजण राष्ट्रवादी आणि शरद पवार संपले असेच म्हणत होते, मात्र ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेल्या शरद पवार यांनी करून दाखविले. आज परळीमध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारे आघाडी घेतली आहे आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने 50 हून जास्त जागा मिळवल्या आहेत, त्यावरून राजकारण आणि समाजकारणातील जाणते राजे असलेल्या शरद पवार यांची ताकद आजही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर असून बीडमधून, जिथे अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, तिथे भाजपाच्या पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. बारामतीतून अपेक्षेप्रमाणे अजित पवार आघाडीवर आहेत, मुंब्रा येथून जितेंद्र आव्हाड, मुंबईतील अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक आदी दिग्गज आघाडीवर आहेत. नाशिक ग्रामीणमध्येही निफाड, येवला, दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. येवला मतदारसंघातून छगन भुजबळ पुन्हा निवडून येतील अशी चिन्हे आहेत. कर्जतमध्ये पवारांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले रोहित पवार आघाडीवर आहेत.ईडीची नोटीस आणि साताऱ्याची सभा ठरली टर्निंग पॉईंटनिवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ईडीच्या नोटीसमध्ये नाव आले होते, मात्र पवारांनी जो पावित्रा घेतला, त्यामुळे ईडीचे अधिकारी व सरकारही हादरले होते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात भर पावसात त्यांनी साताऱ्याच्या सभेत लोकांना मार्गदर्शन केले होते. त्यांची ही कृती सर्वच स्तरातील लोकांना आवडली होती. सोशल मीडियातही पवारांचीच लाट होती. त्याचाही फायदा राष्ट्रवादीने आघाडी घेण्यात झाला आहे.

Share: