IMG-LOGO
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो आपले पिके सांभाळा - हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे

Friday, Oct 18
IMG

राज्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला असून शेतकऱ्यांनी आपली पिके सांभाळावी.

शेतकऱ्यांनो आपले पिके सांभाळा - हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे नाशिक दि.१८ l राज्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचे अंदाज हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला असून शेतकऱ्यांनी आपली पिके सांभाळावी. दि.१८ व १९ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट दिसून येत असून पाऊस नोव्हेंबर पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी खरीपाच्या काढणी योग्य पिक पावसाने नासण्यापूर्वी काढणी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. काढलेले पिक पाण्यात भिजणार नाही इतक्या सुयोग्य उंचीवर कोरड्या जागी साठवणूक करावी. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी रब्बी पिके उशीरा पेरणी करावी. आपल्या भागातील पाऊसमान पाहून व तारतम्य बाळगून मगच रब्बी पिकाच्या पेरणीसाठी निर्णय घ्यावा. असे आवाहन हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी शेतकऱ्यांना केले.

Share: