IMG-LOGO
महाराष्ट्र

पुण्यासह काही जिल्ह्यांत रोहिणी बरसणार

Saturday, May 22
IMG

एक जून रोजी केरळात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

 पुणे, दि. २२  मे : तौत्के चक्रीवादळाचे अद्याप पंचनामेही  झाले नाहीत, तोपर्यंत राज्यात मॉन्सूनची  चाहूल लागली आहे.21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मॉन्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर मॉन्सूनने हजेरी लावली आहे. पुढील आठ दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे एक जून रोजी केरळात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.तत्पूर्वी पुढील तीन-चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मॉन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान निर्मिती झाली असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दहा जून पर्यंत कोकणातही मॉन्सूनचे आगमन होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होणार आहे.

Share: