IMG-LOGO
महाराष्ट्र

अवैध वाळू उपशावर बैठक घेऊः थोरात

Tuesday, Mar 02
IMG

राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे.

मुंबई, दि. २ मार्च : अवैध वाळू उपशाविरोधात विधानभवनाच्या पाय-यांवर 5 तासांपासून अधिक काळ आमदारांनी आंदोलन केले. सकाळी 11 वाजेपासून आमदारांचे हे आंदोलन सुरू होते. आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार आंदोलनासाठी विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसले होते. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची भेट घेऊन विषय जाणून घेतला आणि त्यांचे महसूलमंत्र्यांशी बोलणे करून दिले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नावर बैठक घेऊन तो निकाली काढण्याचे आश्वासन दिले. राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे. थोरात महसूलमंत्री असताना हा विषय मोठा झाला आहे. सरकार बदलले तसे यांचे धोरणही बदलले असल्याचे आमदारांनी म्हटले. मध्यम वर्गालाही वाळूच्या लिलावात सहभागी होता यावे. गरिबांच्या घरांसाठी सहा ब्रास वाळू मोफत मिळाली पाहिजे, अशा मागण्या या आमदारांनी केल्या. वाढीव वीजबिल आणि शेतक-यांचे वीजजोड तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केले. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधान भवनात कृषिपंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीजजोड तोडणी न थांबविल्यास कृषिपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला.सातपुते यांनी अंगात निषेधाचा फलक असलेले बॅनर घातले. त्यानंतर मोटरसह कृषीपंप हातात घेऊन ते विधान भवन परिसरात आले. शेतकर्‍यांचे वीजबिल माफ झालेच पाहिजे, वीजतोडणी रद्द करा अशा मागण्या सातपुते यांनी केल्या. या वेळी सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेधही नोंदवला.

Share: