कपिलदेव कामत मधुबनी जिल्ह्यातील बाबूबरही मतदारसंघातून संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार होते.
नवी दिल्ली, दि. १६ ऑक्टोबर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील पंचायती राज मंत्री आणि जनता दल युनायटेड (JDU) चे नेते कपिलदेव कामत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुरुवारी (15 ऑक्टोबर) रात्री उशिरा पाटण्यातील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला.कपिलदेव कामत मधुबनी जिल्ह्यातील बाबूबरही मतदारसंघातून संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार होते. तसेच बिहार सरकारमध्ये त्यांच्यावर पंचायती राज मंत्रालयाची जबाबदारी होती. कामत हे नितीशकुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते दहा वर्ष मंत्री असून गेल्या 40 वर्षापासून राजकारणात सक्रीय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या प्रकृतीचा विचार करता जेडीयूने त्यांची सून मीना कामत यांना मधुबनी जागेसाठी उमेदवारी दिली आहे.