IMG-LOGO
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाची आज सभा

Saturday, Jan 09
IMG

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी 216 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई, दि. ९ जानेवारी  : मराठा आरक्षावर अद्यापही तोडगा निघत नसल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाची आझाद मैदानावर सभा होणार आहे. मराठा आरक्षण आणि सारथी प्रश्नी मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा एकवटणार असून पुन्हा एकदा हा मुद्दा पेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार असून यासाठी मुंबईत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. विधानसभेत 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या असून त्यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेसाठी 81 कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये दोन्ही समाजासाठी भरीव तरतूद केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी 216 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Share: