IMG-LOGO
मुंबई

अंधेरी ठरली कोरोनाचा हॉटस्पॉट

Saturday, May 15
IMG

जोगेश्‍वरी, अंधेरी पूर्व या परिसराची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख आहे.

मुंबई, दि. १५   मे :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जोर ओसरू लागला आहे. बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे; मात्र जोगेश्‍वरी, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्‍चिम हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. एप्रिल 2020 ते 13 मेपर्यंत येथे एकूण 92 हजार 195 बाधितांची नोंद झाली. अंधेरी पूर्व येथे सर्वाधिक एक हजार 27 आणि अंधेरी पश्‍चिमेत त 765 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या येथे सहा हजार 119 सक्रिय रुग्ण आहेत. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा येथे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने महापालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले. या काळात संसर्ग पश्‍चिम उपनगरात वाढू लागला. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश कर्मचारी के. पूर्वेत राहत असल्याने रुग्णसंख्या वाढत गेली. दुसर्‍या लाटेतही याच विभागात रुग्णसंख्या अधिक दिसून येत आहे. जोगेश्‍वरी, अंधेरी पूर्व या परिसराची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख आहे. आतापर्यंत येथे सर्वाधिक 42 हजार 707 बाधित आढळले. गेल्या वर्षी टाळेबंदी शिथिल झाल्यावर के पूर्वमध्ये व्यावसायिक, औद्योगिक वसाहती, विमानतळ, मोठे हॉटेल्स, एमआयडीसीतील व्यवहारही सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला. सध्या या विभागात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 175 ते 178 दिवसांचा आहे.

Share: