भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नाशिक, दि. २९ ऑगस्ट : अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मठ, मंदिर, धार्मिकस्थळांचे कुलूप उघडून भाविकांना दर्शनासाठी खुली करावीत यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच नाशिक शहरातील धार्मिक स्थळे खुली करण्यात यावी यासाठी मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी व नगरसेवक तथा संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्या नेतृत्ताखाली नाशिक ग्रामदेवता कालिका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिर, विघ्नहर श्री गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री साक्षी गणेश मंदिर, गोंदवलेकर महाराज मंदिर आदीसह 27 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी वसंत उशीर, महिला मोर्चा शहराध्यक्षा हिमगौरी आडके, स्वाती भामरे, निलेश बोरा, धंनजय पुरोहीत, सचिन वाघमारे, ऋषिकेश ठाणगांवकर, अनिकेत पाटील, ललिता बिरारी, अलका जांबेकर, भास्कर सटाणकर, सोनल दगडे, विजय गायखे, अशोक चौधरी, नितिन कोचर, मनिषा देवरे, स्वाती वडगुले, सागर विसे, अशोक जाधव व समस्त भाविक व पुजारी आदी उपस्थित होते.