निशिकांत कामतने 'दृश्यम,मदारी,फुगे यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे.
हैदराबाद, दि. १७ ऑगस्ट : दिग्दर्शक निशिकांत कामत याचं निधन झालं आहे.दृश्यम, लय भारी, डोंबिवली फास्ट अशा चित्रपटांतून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक निशिकांत कामत हे यकृताच्या विकाराने त्रस्त होते. साडेचार वाजता त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. निशिकांत कामतने 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2006 मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने 'दृश्यम,मदारी,फुगे यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. याशिवाय,सातच्या आत घरात,रॉकी हॅण्डसम,जुली,भावेश जोशी या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला आहे.