उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसीमुळे पुरुष किंवा स्त्रिया यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही.
सर्व स्तनदा महिलांसाठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण करण्याची शिफारसप्रजननक्षम वयोगटातील लोकसंख्येमध्ये कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणामुळे नपुसंकत्व आणि वंध्यत्व येण्याबद्दल आणि कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण स्तनदा महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, याबद्दल चिंता व्यक्त करणारी वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आहेत.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) (https://www.mohfw.gov.in/pdf/FAQsforHCWs&FLWs.pdf) या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या एफएक्यू म्हणजेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे की, उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसीमुळे पुरुष किंवा स्त्रिया यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. लसीचे कोणते दुष्परिणाम आहेत का..? याचे मूल्यांकन करण्यासाठी संपूर्ण लस आणि लसीतील घटकांची प्रथम प्राण्यांवर आणि नंतर मानवी चाचणी केली जाते.लसीची सुरक्षा आणि परिणामकारकता सुनिश्चित झाल्यानंतरच लसी वापरासाठी प्राधिकृत केल्या आहेत. याशिवाय,कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणामुळे नपुसंकत्व/ वंध्यत्वासंबंधीचे प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण पुरुषांमधील नपुसंकत्व आणि स्त्रियांमधील वंध्यत्वाला कारणीभूत ठरू शकेल असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (एनटीएजीआय )कोविड -19 कार्यकारी गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एन. के.अरोरा यांनी यासंदर्भातली भीती आणि आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, भारतात आणि परदेशात पोलिओ लसीकरणाच्या वेळीही ,पोलिओ लस घेत असलेल्या मुलांना भविष्यात नपुसंकत्वाचा सामना करावा लागू शकतो, अशी चुकीची माहिती पसरविण्यात आली होती. त्यांनी आश्वस्त केले की, या सर्व लसींची सखोल शास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून तपासणी होते आणि कोणत्याही लसीमुळे या प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत.कोविड -19 साठी लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञ गट (एनईजीव्हीएसी) ने, सर्व स्तनदा महिलांसाठी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण करण्याची शिफारस केली आहे आणि लसीकरण सुरक्षित असून लस घेण्यापूर्वी किंवा लसीकरणानंतर स्तनपान बंद करणे किंवा थांबविणे आवश्यक नाही असे म्हटले आहे.