IMG-LOGO
मंथन

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

Friday, Dec 04
IMG

गुलाटीजी ! इथुन पुढे "असली मसाले सच सच...." अस जाहिरातीत ऐकू येईल तेव्हा तुमची उणीव नक्की भासेल.

प्रख्यात इंग्रजी साहित्यिक पी.जी.वुडहाऊस ह्याची मुलगी वारली तेव्हा त्याने खिन्नपणे प्रतिक्रिया दिली होती की, "I thought she was immortal"काल सकाळी महाशय धर्मपाल गुलाटी ह्यांच्या निधनाची बातमी वाचून तसच वाटलं.नेल्सन मंडेला, क्वीन एलिझाबेथ असो किंवा महाशय गुलाटी ही मंडळी एकेका पिढीसाठी आजी -आजोबांसारखी असतात.फेसबुक, व्हाट्सएपसारख्या सोशल मिडियावर 'यमराजच्या डोळ्यात मसाला फेकुन पळालेला' माणुस असा विनोद गुलाटींवर व्हायचा कारण कित्येक वर्षे त्यांच MDH मसाल्याच्या जाहीरातीमधल ठणठणीत रूप समोर यायचं.आज त्यांची निधनाची बातमी वाचून असच वाटतय की "ताऊजी ! बहुत जल्दी कर दी !"फाळणी नंतर सर्वस्व गमावून अवघे 1500/-रु घेऊन भारतात आलेल्या या तरुणाने कष्टाने करोडो रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ते करीत असताना कधीही दानधर्म करण्यात हात आखडता घेतला नाही. अशा व्यक्तीच जाण खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण करत.गुलाटीजी ! इथुन पुढे "असली मसाले सच सच...." अस जाहिरातीत ऐकू येईल तेव्हा तुमची उणीव नक्की भासेल.सौरभ रत्नपारखी

Share: