प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त र्वैदिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येतो.
नाशिक शहराची ओळख मंत्र भूमी यंत्र भूमी म्हणून सर्वदूर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची भूमी म्हणून व वेद अध्ययन यज्ञयाग श्रौत स्मार्त याग व प्रकांड विद्वानांची नगरी अशी नाशिक शहराची ओळख संपूर्ण जगासमोर आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गेल्या पंधरा वर्षापासून महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान वेद पठण , संस्कार संवर्धनाचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त र्वैदिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येतो. आजपर्यंत तेरा वैदिक विद्वानांना ब्रह्मरत्न व ८१ सामाजिक कार्यकर्त्यांना सेवाव्रती पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्येष्ठ संपादक विश्वास देवकर यांच्या संकल्पनेतून हे ऊपक्रम राबविले जातात. समाजातील दानशूरांचे आर्थिक पाठबळ या उपक्रमांना मिळत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सार्वजनिक कार्यक्रम टाळून राज्यात बारा ठिकाणी अग्निहोत्री विद्वानांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार आहे.अग्निहोत्र संकल्पना सूर्यशक्तीशी संबंधित आहे.कोरोना संकटाचा सामना करताना ही निसर्ग शक्ती संवर्धित करणाऱ्या अग्नीहोत्रींचे मोल निश्चितच महत्वाचे आहे. पर्यावरण दिनी उद्या ता. ५ जून २०२१ रोजी नाशिकमध्ये 92 वर्षीय वेदशास्त्रसंपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा प्रतिष्ठानतर्फे ब्रह्मरत्न पुरस्कार देउन सन्मान करण्यात येईल. ते गेल्या ४३ वर्षांपासूनअग्निहोत्राची यज्ञ नारायणाची सेवा अविरतपणे करत आहेत. २१ हजार रुपये रोख गुरू दक्शिणा , स्मन्मान चिन्ह , मानपत्र व महावस्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डा.राम कुलकर्णी , मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डा.अस्मिता वैद्य यांच्या उपस्थितीत आंबेकर यांच्या निवासस्थानी पुरस्कार वितरण झाले. अन्य पुरस्कारांर्थींमध्ये नागपूर येथील आहिताग्नी श्री विनायक काळी, देऊळगाव राजा येथील आहिताग्नी श्री माधव अग्निहोत्री, सातारा येथील आहिताग्नी गोविंदशास्त्री जोशी, नृसिंहवाडी येथील आहिताग्नी विजय मणेरीकर, रत्नागिरी येथील राजापूर येथे असलेल्या आहिताग्नी अनिरुद्ध ठाकूर, पंढरपूर येथील आहिताग्नी भीमाचार्य वरखेडकर, बार्शीत आहिताग्नी चैतन्य काळे, गंगाखेड येथील आहिताग्नी यज्ञेश्वर सेलूकर, तिरूपती येथील आहिताग्नी ओंकार सेलूकर तर पुण्यातील आहिताग्नी सुधाकर कुलकर्णी व आहिताग्नी शांताराम जोशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. . प्रत्येकी ११ हजार रुपये रोख गुरू दक्शिणा , स्मन्मान चिन्ह , मानपत्र व महावस्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार टप्प्याटप्प्यात देण्यात येतील.नाशिक शहरातील नाव दरवाजा परिसरात राहणाऱ्या अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा जन्म 21 मार्च 1928 रोजी झाला. सन 1937 मध्ये उपनयन संस्कार झाल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या शिक्षणाला प्रारंभ केला गुरुवर्य घनपाठी नारायण केशव देव यांच्याकडे शुक्ल यजुर्वेद संहिता व शतपथ ब्राह्मण यातील काही भागांचे अध्ययन त्यांनी केले त्यानंतर त्यांना गुरुवर्य नारायण शास्त्री भानोसे यांच्याकडून श्रौत स्मार्त कर्मकांड व यज्ञाच्या शिक्षणाचे अध्ययन मिळाले हे अध्ययन सुरू असतानाच पौरोहित्य हेच उपजीविकेचे साधन म्हणून सन 1978 च्या मे महिन्यात त्यांना श्रौत व स्मार्त अग्निहोत्राचे आधान झाले तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे त्रेचाळीस वर्षापासून अग्निहोत्राचे सर्व नियम अंगी करून हे कार्य एकनिष्ठेने आणि अविरतसुरू ठेवले आहे सन 1978 सालापासून ते आजपर्यंत दर्शपूर्णमास इष्टी आणि सायंप्रार्थना होम सुरू आहे तसेच दर वर्षी चातुर्मास्य याग करण्यात येतो सन 1981 ते 1983 या काळात स्वर्गस्थ सत्र प्रयाग व सन 1985 मध्ये कामेश अनुष्ठान त्यांनी केले आहे त्याचबरोबर सन 1999 मध्ये नक्षत्र सत्र तर सन 2009 आणि 10 मध्ये नाशिक येथील प्रसिद्ध अशा भद्रकाली देवी मंदिरात नक्षत्र सत्र यागाचे आयोजन करून तो यशस्वी केला आहे. सलग चाळीस वर्ष अविरतपणे या यज्ञ नारायणाची सेवा करण्या बरोबरच सप्त सोम वाजपेयी यासारखे याग संपन्न केलेल्या त्यांच्या आई-वडिलांकडून याची दीक्षाच त्यांना मिळाली. आई-वडिलांच्या निधनानंतर अग्निहोत्री आंबेकर गुरुजींनी ही श्रौत यागाची परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे कात्यायन सूत्रानुसार आज तागायत यज्ञ नारायणाची सेवा अविरतपणे सुरूच आहे.त्यांच्या या यज्ञ नारायणाच्या सेवेची दखल घेऊन ऑगस्ट 2007 मध्ये त्यांना पुण्याच्या वेदशास्त्र उत्तेजक सभेच्या वतीने सन्मानित करण्यात आले तर याच वर्षी त्यांना शृंगेरी पीठाधीश्वर यांच्या तर्फे आयोजित केलेल्या वैदिक संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.अग्निहोत्री आंबेकर गुरुजींच्या या कार्याची दखल जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घेण्यात आली आहे आज पर्यंत त्यांना नवी दिल्ली अहमदाबाद पुणे गोवा नाशिक अहमदनगर या ठिकाणी होणाऱ्या वैदिक संमेलनात विशेष निमंत्रित म्हणून सन्मानित केले जाते त्याच बरोबर कांची कामकोटी येथील शंकराचार्य द्वारा आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक अग्निहोत्री संमेलनात त्यांना आवर्जून निमंत्रण दिले जाते या सर्वच कार्यक्रमात आजही आंबेकर गुरुजी उपस्थित राहून निरनिराळे याग संपन्न करीत असतात.अग्निहोत्री श्री आंबेकर गुरुजी यांच्या या कार्याची महती सर्वदूर आहे.त्यांच्या या कार्याचा गौरव नाशिक येथील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदपाठ शाळेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्यांना ब्रह्म रत्न पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.या सत्कारामागे नम्रतेच्या नमस्काराची भावना आहे.निसर्गपूजक अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकरनाशिकमध्ये महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण दिनी उद्या ता. ५ जून २०२१ रोजी 92 वर्षीय वेदशास्त्रसंपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार आहे.. ते गेल्या ४३ वर्षांपासून अग्निहोत्राची यज्ञ नारायणाची सेवा अविरतपणे करत आहेत. २१ हजार रुपये रोख गुरू दक्शिणा , स्मन्मान चिन्ह , मानपत्र व महावस्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.वेदमूर्ती श्री. रविंद्र पैठणे गुरूजी,सचिव तथा प्रधानाचार्य महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, नाशिक.