अपचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची काळजी स्वतःच घेण्यास प्राधान्य द्यावं.
पोटात दुखणे, कफ, गॅस, अॅसीडीटी या आजाराचा त्रास प्रत्येकालाच होतो. या आजाराचे मुख्य कारण पचन न होणे. पोट साफ झाले नाही तर विविध आजारांचा त्रास सुरू होतो. या सारख्या आजारांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, तर करा हे उपाय. हे उपाय केले तर पोटाच्या आजारापासून मुक्ती मिळेल. यातून कोणताही त्रास ४८ तासांहून अधिक जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. अपचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची काळजी स्वतःच घेण्यास प्राधान्य द्यावं. चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. जेणेकरून, अपचनाची समस्या नियंत्रणात आणता येईल. लिंबामध्ये 'सी' जिवनसत्व असते. रोजच्या आहारामध्ये लिंबाचा वापर केला तर पोटाचे आजार होणार नाहीत. कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकूण प्यालानंतर कफ होत नाही.आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं, डाळी, सुका मेवा, पचनाला हलके असणारी धान्य यांचा समावेश करा. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी बडीशेप, काकडीची कोशिंबीर, धणे घातलेला चहा, कोकम सरबत प्यावं. काहींना कच्च आलं आणि लसूण खाण्याची सवय असते. यांच्या सेवनानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण, त्याच्या अतिसेवनानं पचनक्रियेला हानीही पोहोचू शकते. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी पदार्थ योग्य प्रमाणात पोटात जाणं गरजेचं आहे.