नवी दिल्ली : आज दुपारी 3 वाजता निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होईल. दिल्लीत काल निवडणूक आयोगाची बैठक पार पडली.. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. यंदा 7 ते 8 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली, दि. १६ : आज दुपारी 3 वाजता निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होईल. दिल्लीत काल निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. यंदा ७ ते ८ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.गुरुवारी दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयुक्त सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी आपल्या कार्यभार सांभाळला. मुख्य निडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोघांचं स्वागत केलं. काल सकाळी अकरा वाजता निवडणूकीच्या तारखांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषेदेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. गेल्या म्हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ जागा पटकावल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ ५२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी भाजपचं नेतृत्व असलेल्या एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत मुख्य लढत असणार आहे. गेल्यावेळी ७ टप्प्यात मतदान२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात घेण्यात आली होती. गेल्या वेळी १० मार्चला निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे २०१९ रोजी झालं होतं. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली होती. त्यावेळी देशात ९१ कोटीहून अधिक मतदार होते, ६७ टक्के मतदान झालं होतं.भाजपाचा अश्वमेध...२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ मध्ये भाजपने तीनशेचा टप्पा पार करत ३०३ जागा पटकावल्या होत्या. तर एनडीएने ३५३ जागा मिळवल्या होत्या. आता भाजपने चारशेहून अधिक जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर होणारलोकसभा निवडणूक २०२४ तारखांबरोबरच काही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये निवडणूका होणार आहेत.