केदार शिंदे यांनी एक ट्विट करत या गोविंदा पथकांतील हजारो गोविंदांच्या आर्थिक विवंचनेला वाचा फोडली आहे. केदार शिंदे यांनी एक ट्विट केले
मुंबई दि. १२ ऑगस्ट : गेले ४ महिने कोरोना महामारीच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन अजून देखील संपलेला नाही. तर, या संसर्गाची वाढती रुग्णसंख्या बघता येणारे सर्व सण, उत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वच स्थरातून करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच अशी परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे.याच, पार्श्वभूमीवर आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्विट करत या गोविंदा पथकांतील हजारो गोविंदांच्या आर्थिक विवंचनेला वाचा फोडली आहे. केदार शिंदे यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी जी कोटींची पारितोषकं राजकारणी मंडळी बक्षीस म्हणून हंडी फोडणाऱ्या पथकांना दरवर्षी देत असतात तसेच हे पैसे यंदा ते या पथकांमध्ये का वाटत नाहीत? असा सवाल देखील उपस्थित करत हे काम करण्याचं देखील केलं आहे.