वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला.
युगाब्द : ५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ २३ शके १९४२सूर्योदय : ०७:०४सूर्यास्त : १८:३४चंद्रोदय : ०७:३३चंद्रास्त : १९:१२शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : माघपक्ष : शुक्ल पक्षतिथि : प्रतिपदा - ००:२९, फेब्रुवारी १३ पर्यंतनक्षत्र : धनिष्ठा - १४:२३ पर्यंतयोग : परिघ - ०२:२०, फेब्रुवारी १३ पर्यंतकरण : किंस्तुघ्न - १२:२८ पर्यंतद्वितीय करण : बव - ००:२९, फेब्रुवारी १३ पर्यंतसूर्य राशि : मकर - २१:२७ पर्यंतचंद्र राशि : कुंभराहुकाल : ११:२३ ते १२:४९गुलिक काल : ०८:३० ते ०९:५६यमगण्ड : १५:४१ ते १७:०८अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:१२दुर्मुहूर्त : ०९:२२ ते १०:०८दुर्मुहूर्त : १३:१२ ते १३:५८वर्ज्य : २१:५० ते २३:२९आज जागतिक महिला आरोग्य दिन आहेस्वामी दयानंद सरस्वती (मूळ नाव मूळशंकर तिवारी) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचे होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचे खंडनही यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.१८२४: संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक ( शंकर करसनदास तिवारी तथा ) स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)द ग्रेट मराठा महादजी शिंदे : वयाच्या दहाव्या वर्षापासून तो वडिलांबरोबर रणांगणा जात होते. दहाव्या वर्षी वरात येथील युद्धात तोसहभागी झाला होते. राणोजी शिंदे आणि त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर पेशवा दरबाराने महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची दखल घेऊन त्यांच्याकडे शिंदे दौलतीचा कारभार सोपवला होता.१७४५ ते १७६१ दरम्यान मराठ्यांचा राज्य विस्तारातील जो सुवर्णकाळ मानला जातो, त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व केले होते. मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मतनगर ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर, तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत त्यांचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.पानीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठी साम्राज्याला पुन्हा नव्याने उभारी मिळवून देण्याचे काम करणाऱ्या महादजी शिंदे यांना मराठा साम्राज्याचे महान सरदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या करारी बाण्यामुळेच इंग्रजांनी त्यांना द ग्रेट मराठा म्हणून संबोधले होते.पानीपत युद्धानंतर उत्तरेतील मराठी सत्तेला मोठा हादरा बसला. त्यावेळी अगदी मराठा सत्ता लयाला जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिंदे, होळकर, पवार असे नवे सरदार निर्माण झाले होते. उत्तरेत पुन्हा मराठ्यांची सत्ता स्थापन करण्याचे काम या सरदारांनी केले. या मराठासरदारांपैकी महादजी शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. दिल्लीचा बादशहा कोण असावा याबाबत महादजी निर्णय घेत असे म्हटले जाते. एवढे सामर्थ्य महादजी शिंदे यांच्यात होते.शिंदे दौलतीचा कारभार ताब्यात मिळाल्यानंतर महादजी शिंदे यांनी १७६९ ते १७९२ या कालखंडातच उत्तर भारतात यशस्वी मोहिमांचे आयोजन करून महादजी शिंदे यांनी शिंद्यांचे स्वतंत्र असे अस्तित्त्व निर्माण केले. पानीपतच्या युद्धात गमावलेली मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देत महादजी शिंदे यांनी मोघल बादशहास आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. त्यांच्या कालखंडात उत्तर भारतात पुन्हा मराठ्यांच्या साम्राज्यास झळाळी मिळाली होती. • १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन. (जन्म : ३ डिसेंबर, १७३०)घटना :१५०२ : लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.१९७६ : पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते इडुक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.२००३ : आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.• मृत्यू :• १९९८ : कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म : १० जुलै १९१३)• २००० : सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.• २००१ : अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन. (जन्म : १० सप्टेंबर १९४८)जन्म :१७४२ : बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू : १३ मार्च १८००)१८७१ : इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज यांचा जन्म. (मृत्यू : ५ एप्रिल १९४०)१९२० : चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म. (मृत्यू : १२ जुलै २०१३)१९४९ : शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.