शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले.
मंगळवार, मे ४, २०२१ युगाब्द :५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४३सूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १८:५७चंद्रोदय : ०२:११, मे ०५ चंद्रास्त : १२:५४शक सम्वत : १९४३ प्लवचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : अष्टमी - १३:१० पर्यंतनक्षत्र : श्रवण - ०८:२६ पर्यंतयोग : शुक्ल - २०:२२ पर्यंतकरण : कौलव - १३:१० पर्यंतद्वितीय करण : तैतिल - ०१:१०, मे ०५ पर्यंतसूर्य राशि : मेषचंद्र राशि : मकर - २०:४४ पर्यंतराहुकाल : १५:४४ ते १७:२१गुलिक काल : १२:३१ ते १४:०८यमगण्ड : ०९:१९ ते १०:५५अभिजितमुहूर्त : १२:०६ ते १२:५७दुर्मुहूर्त : ०८:४० ते ०९:३१दुर्मुहूर्त : २३:२४ ते ००:०९, मे ०५अमृत काल : २२:२८ ते ००:०७, मे ०५वर्ज्य : १२:३४ ते १४:१३आज कोळसा खान कामगार दिन आहेआज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन आहेहरिभाऊंना चित्रकला व इतिहास या विषयांतील विशेष आवडीमुळे त्यांनी शालेय शिक्षणानंतर प्रथम मुंबईला जीडी आर्ट्स व नंतर उज्जैनला विक्रमशीला विद्यापीठात शिक्षण घेतलं. उच्च शिक्षणानंतरही योग्य नोकरी न मिळाल्यामुळे उज्जैनमध्येच त्यांनी काही काळ एक आर्ट सेंटर चालवलं. मग काही काळ मुंबईला एका संग्रहालयामध्ये नोकरी केली. परत उज्जैनलाच ते विक्रमशीला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांना मुळात असलेली इतिहास व पुरातत्त्व शाखांची आवड स्वतंत्र संशोधनासाठी खुणावत होती. कालिदासाने ‘मेघदूता’ची रचना ज्या ठिकाणी केली, त्या ‘रामगढ’ या ठिकाणाचा (रामगिरी पर्वत) संशोधनपर अभ्यास व्हावा व तेच हे ठिकाण आहे का, हे सिद्ध करता यावे, या हेतूने हरिभाऊंनी तिथे जाऊन त्या परिसराचा अभ्यास सुरू केला. तिथे त्यांना आश्चर्यकारक खुणा सापडल्या.भोपाळच्या दक्षिणेला रायसेन जिल्ह्यातले ‘भीमबेटका’ हे अज्ञात ठिकाण मानववंशाच्या इतिहासाच्या किती महत्त्वाच्या खुणा सांभाळत आहे, हे तोवर कोणालाच ज्ञात नव्हतं. हरिभाऊ तिथे गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की, या पोकळ्या म्हणजे प्राचीन गुहा आहेत. कोणत्याही सोयी-सुविधा नव्हत्या, त्या काळीही हरिभाऊ सलग १५ वर्षं तिथं जात राहिले. त्यांचे अभ्यास व संशोधन कार्य सुरुच होते. त्यावेळी त्या जंगलात भोजनाची काही व्यवस्था होणं शक्यच नव्हतं. हरिभाऊ जाताना सोबत बटाटे घेऊन जात. ते तिथे पोहोचताच वाळूत पुरून ठेवत व काम करत राहत. थोड्या वेळानंतर ते वाळूतल्या उष्णतेमुळे आपोआप भाजले जात. त्यावर त्यांची गुजराण होई. त्या परिसराचा इतिहास उजेडात आणण्याकरिता त्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेतले. त्या गुहांमध्ये त्यांना भिंतींवर, छतावर रंगवलेली प्राचीन चित्रं आढळली. वनस्पतीजन्य वा खनिज रंगात रंगवलेल्या चित्रांचा अक्षरशः खजिनाच त्या गुहांमध्ये त्यांना सापडला. विंध्यपर्वताच्या कुशीत, घनदाट जंगलातील सात डोंगरांमध्ये विखुरलेल्या ७५० गुहांमधल्या ५००च्या वर गुहांमध्ये चित्रं होती. चित्रं प्रामुख्याने लाल व पांढर्या रंगात रंगवलेली होती. काही काही ठिकाणी हिरव्या व लाल रंगांचे ठिपके होते.सरस्वती नदीचं स्थान भारतीय संस्कृतीत मोलाचे आहे. ऋग्वेदांतील ऋचांमध्येदेखील ’अंबीतमे’, ‘नदीतमे’, ‘देवीतमे’, ‘सरस्वती’, ‘अन्नवती’, ‘उदकवती’ असे तिचे उल्लेख आहेत. सरस्वती व तिचं लुप्त होणं हे मिथक नसून ऐतिहासिक व भौगोलिक सत्य आहे, हे सिद्ध करण्याकरिता अनेक देशी-विदेशी संशोधकांनी काही काम केले होते. या सर्वांचा आधार घेत हे काम पुढे न्यावे याकरिता मोरोपंत पिंगळे यांच्या सूचनेनुसार १० फेब्रुवारी, १९८३ रोजी कुरुक्षेत्र येथे एक चर्चासत्र आयोजित केले. त्यात ’सरस्वती नदी अध्ययन केंद्रा’ची स्थापना झाली. या समितीचे संयोजक म्हणून हरिभाऊंची नियुक्ती झाली. हरिभाऊंच्या ’सरस्वती नदी शोध अभियान’ या संशोधन प्रकल्पातून सरस्वतीचा प्रवाह, तिच्या काठची संस्कृती, याचा शोध घेणं सुरू झालं. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन सरस्वती नदीचा मार्ग शोधण्याकरिता ‘इस्रो’ने साहाय्य केले. आदिबिद्री या सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतापासून, कच्छ व गुजरातच्या रणांमधून असा जवळजवळ चार हजार किलोमीटरचा प्रदेश हरिभाऊंच्या चमूनं पालथा घातला. पुरातत्त्व शास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, हिमालय अभ्यासक, तज्ज्ञ छायाचित्रकार, लोककला अभ्यासक यांचा समावेश या चमूत होता. या यात्रेत त्यांनी अनेक अवशेष एकत्र केले व उज्जैन विद्यापीठासमोर ठेवले. तिथून सरस्वती नदीवरील संशोधन प्रकल्पांना अधिक गती मिळाली.हरिभाऊंच्या संपूर्ण आयुष्यात या संशोधन कार्यासोबतच सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाचा प्रवाहदेखील तितक्याच ठळकपणे वाहत होता. तरुण वयात स्वातंत्र्य सैनिक असलेल्या हरिभाऊंनी नंतर रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून व काही काळ अ. भा. विद्यार्थी परिषदेचे मध्यप्रदेश प्रांताचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९६६ साली प्रयाग येथे झालेल्या विश्व हिंदू संमेलनाकरिता एकनाथजी रानडे यांच्या विनंतीनुसार प्रदर्शनी विभाग सांभाळण्याकरिता ते गेले. त्यांची कलासक्त वृत्ती व सौंदर्यदृष्टी याचा पुरेपूर वापर त्यांनी संमेलनात केला. त्यानंतर अशा मोठ्या संमेलनांत त्यांची ती जबाबदारीच होऊन गेली. त्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती, कला व इतिहास या विषयावर व्याख्याने देत देश-विदेशात भरपूर प्रवास केला. १९८१ साली ’सा कला या विमुक्तये’ अर्थात, ’कला तीच जी बंधमुक्त करते’ हा विचार घेऊन ललितकला क्षेत्रात काम करणारी ’संस्कार भारती’ ही संघटना सुरू झाली. तिचे संस्थापक महामंत्री म्हणूनही हरिभाऊंनी काम पाहिले. काही काळ ते संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुखही होते. संघाशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी कधीच नाकारली वा लपवली नाही. त्यांच्या पीएच.डीवेळी समितीतील एका सदस्याने त्यांना सांगितले, ’‘तुमच्या प्रबंधातील संघाचा उल्लेख तेवढा काढून टाका.” त्यावर ते उत्तरले, ‘’तुम्ही मला पीएच.डी दिली नाहीत तरी हरकत नाही. पण, माझ्या संपूर्ण संशोधनात मला साहाय्यभूत ठरलेल्या माझ्या संघबंधूंचे ऋण मी कसं नाकारू?”१९१९ : जागतिक ख्यातीचे शैलाश्रायाचे अध्ययन करणारे, पाषाणावर काढलेल्या चित्रांचा अभ्यास करणारे, त्यामधून भारताच्या आणि जगाच्या उत्क्रांतीचा इतिहास एकत्रित मांडणारे कलाकार, चित्रकार, व्यासंगी, ज्ञानी, सतत ज्ञानाची आकांक्षा असणारे पद्मश्री डॉ विष्णु श्रीधर वाकणकर ऊर्फ ‘हरिभाऊ वाकणकर यांचा जन्म ( मृत्यू : ३ एप्रिल, १९८८)घटना :१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.१९०८ : लोकमान्य टिळकांच्या अकोल्यातल्या एका सभेला श्रीगजानन महाराज उपस्थित होते, तारीख होती ४ मे १९०८, निमित्त होते शिवजयंतीच्या उत्सवाचे..!शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. खटला चालू असताना श्री गजानन महाराजांनी त्यांना भाकरीचा प्रसाद पाठवला सज्जनांसी त्रास झाल्याविना | राज्यक्रांति होईना ||कंसाचा तो मनी आणा | इतिहास म्हणजे कळेल||या भाकरीच्या बळावरी | तो करील मोठी कामगिरी ||जातो जरी फार दूरी | परी न त्याला इलाज || तेथे ‘गितारहस्य‘ हा ग्रंथ लिहिला गेला. गजानन महाराजांचे शब्द खरे ठरले.१९५९: पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.मृत्यू : • १९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन. ( जन्म : ७ सप्टेंबर, १९२० )• १९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)• २००८: तबलावादक पद्म विभूषण किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर, १९२३)जन्म :१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)१७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी, १८४७)१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: २० , ऑक्टोबर, २००९)१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म. ( मृत्यू : ६ मे, २०१८ )१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार पद्मभूषण सॅम पित्रोदा यांचा जन्म.