१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता.
युगाब्द : ५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक वैशाख २३ शके १९४३सूर्योदय : ०६:०१सूर्यास्त : १९:०१चंद्रोदय : ०८:२९चंद्रास्त : २२:११शक सम्वत : १९४३ प्लवचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि : तृतीया - ०७:५९ पर्यंतनक्षत्र : मृगशीर्ष - ०८:३९ पर्यंतयोग : धृति - ०२:२९, मे १६ पर्यंतकरण : गर - ०७:५९ पर्यंतद्वितीय करण : वणिज - २१:०३ पर्यंतसूर्य राशि : वृषभचंद्र राशि : मिथुनराहुकाल : ०९:१६ ते १०:५४गुलिक काल : ०६:०१ ते ०७:३८यमगण्ड : १४:०९ ते १५:४६अभिजितमुहूर्त : १२:०५ ते १२:५७दुर्मुहूर्त : ०६:०१ ते ०६:५३दुर्मुहूर्त : ०६:५३ ते ०७:४५अमृत काल : ००:१०, मे १६ ते ०१:५६, मे १६वर्ज्य : १७:५७ ते १९:४४१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवली आहे.आज कुटुंबपरिवार दिवस आहेतत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर - पाश्चात्त्य संस्कृतीच्या नव्या झगझगाटाच्या वातावरणात देवेंद्रनाथांनी भारतीय सनातन अध्यात्माची प्रतिष्ठा मानून स्वतःच्या विचाराने व आचाराने तिचा पुरस्कार केला. राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या ब्राह्मो समाजाच्या कार्याला त्यांनीच यथोचित वळण दिले. तत्त्वबोधिनी पत्रिका (स्था. १८४०) ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस त्यांनी गती देऊन मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ह्या पत्रिकेचे पहिले संपादक अक्षयकुमार दत्त होते. देवेंद्रनाथांची ब्राह्मो धर्मावरील निरूपणे व ब्राह्मो समाजातील व्याख्याने ह्या पत्रिकेत नियमितपणे प्रसिद्ध होत असत. त्यामुळे लोकजागृती होऊन समाजाच्या ध्येयधोरणांचा व विचारांचा प्रसार होण्यास खूपच मदत झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. ब्राह्मधर्म (२ खंड, १८४९, १८५०) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला होता. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत (बांगला भाषाय संस्कृत व्याकरण, १८४५) प्रथम त्यांनीच लिहिले. स्वरचित जीवनचरित (१८९८) हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे सत्येंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित नावाने इंग्रजीत भाषांतरही केले. ब्राह्मो धर्मासंबंधीची देवेंद्रनाथांची मते व विचार त्यांच्या ब्राह्मोधर्मेर व्याख्यान (२ खंड, १८६१, १८६६) वगैरे पुस्तकांत संकलित आहेत. आत्मतत्त्वविद्या (१८५२), ब्राह्मधर्मेर मत ओ बिश्वास (१८६०) इ. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत.*• १८१७ : भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू : १९ जानेवारी, १९०५)फिल्ड मार्शल - करिअप्पा हे भारतातील त्या दोन सेनाधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांना फाइव्ह स्टार रँक मिळाला आहे. यातील दुसरे नाव म्हणजे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ. करिअप्पा १९५३ साली आपल्या सक्रिय सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर दोन वेळा लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली. पण दोन्हींत ते पराभूत झाले. पुढे १९८६ मध्ये राजीव गांधींच्या शासनात त्यांना फील्ड मार्शल करण्यात आले.*• १९९३ : स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म : २८ जानेवारी, १८९९)घटना :१७१८ : जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.१७३० : रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.१९२८ : मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.१९३५ : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.१९४० : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.१९४० : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.१९६१ : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.मृत्यू :१९९४: जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन. ( जन्म : २७ एप्रिल, १९५५)• १९९४ : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.जन्म :• १९०३ : साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९७७)• १९०७ : क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (हुतात्मा : २३ मार्च, १९३१)• १९६७ : अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.