IMG-LOGO
मनसा स्मरामि

मंगळवार, 2 मार्च 2021

Tuesday, Mar 02
IMG

सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले. विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला.

युगाब्द : ५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक फाल्गुन ११ शके १९४२सूर्योदय : ०६:५३सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय : २१:४८चंद्रास्त : ०९:०८शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : माघपक्ष : कृष्ण पक्षतिथि : चतुर्थी - ०२:५९, मार्च ०३ पर्यंतनक्षत्र : चित्रा - ०३:२९, मार्च ०३ पर्यंतयोग : गण्ड - ०९:२६ पर्यंतक्षय योग : वृद्धि - ०५:५९, मार्च ०३ पर्यंतकरण : बव - १६:२१ पर्यंतद्वितीय करण : बालव - ०२:५९, मार्च ०३ पर्यंतसूर्य राशि : कुंभचंद्र राशि : कन्या - १६:३० पर्यंतराहुकाल : १५:४४ ते १७:१२गुलिक काल : १२:४७ ते १४:१५यमगण्ड : ०९:५० ते ११:१८अभिजितमुहूर्त : १२:२३ ते १३:१०दुर्मुहूर्त : ०९:१४ ते १०:०२दुर्मुहूर्त : २३:३३ ते ००:२२, मार्च ०३अमृत काल : २१:३८ ते २३:०६वर्ज्य : १२:५१ ते १४:१९नमामि देवं सकलार्थदं तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतम्ं।गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभावसनं च॥...आज अंगारक  संकष्ट  चतुर्थी आहेपायो जी म्हें तो राम रतन धन पायो।वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरू, किरपा कर अपनायो॥जनम-जनम की पूँजी पाई, जग में सभी खोवायो।खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढ़त सवायो॥सत की नाँव खेवटिया सतगुरू, भवसागर तर आयो।'मीरा' के प्रभु गिरिधर नागर, हरख-हरख जस पायो॥• १५६८: मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.विश्वासराव  - पानिपतच्या भूमीवरून विश्वासराव यांनी वडील नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले एक पत्र हृदयाचा ठाव घेणारे आहे. त्यामध्ये ते लिहितात की, ‘फौज व खजिना पाठविणे. मी आपल्यासाठी लिहित नाही, माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधु मिळणार नाही.ʼ पानिपतच्या रणभूमीवर १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरू झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते. दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. मात्र याचवेळी तिसऱ्या प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले. त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते. त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवले. बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले. विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर खचला. सैन्यात पळापळ सुरू झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले. विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला. नाना फडणवीस यांच्या मातोश्रीही त्या अंबारीत होत्या. त्या पार्वतीबाईस समजावू लागल्या. पानिपतच्या रणभूमीवर  विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता, तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि बापूजी हिंगणेही कैद झाले. ही बातमी शुजादौल्लास लागल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतले. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले. अठरा वर्षांच्या मिशीही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांना हळहळ वाटली. दुराणी शिपायांनी ते पार्थिव पाहून अहमदशहा अब्दाली यास एक विनंती केली की, मराठ्यांच्या राज्याचे हे प्रेत आम्हास द्या, आम्ही त्यात पेंढा भरून ते काबूलास विजयचिन्ह म्हणून नेतो. पण तसे काही न होता गणेश वेदांती व काशीराजा वगैरे मुत्सद्दी लोकांनी एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडवून घेतले. शुजाच्या विनंतीवरून ते त्याच्या छावणीत परत आणून त्याचे शास्त्रोक्तपणे दहन करण्यात आले.१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी , १७६१)श्री दत्त महाराजांची विद्वत्ता आणि नम्रता अतुलनीय होती. त्यांना अनेक शास्त्रांचे शाब्दिक ज्ञान प्राप्त झाले होते. कमी होती ती प्रत्यक्ष अनुभूती! त्यांना तेही भाग्य लाभले. ते गुळवणी महाराजांच्या सहवासात आले. थोड्याच दिवसांत एकमेकांचा स्नेह जुळला. गुळवणी महाराजांनी त्यांना शक्तिपातदीक्षा दिली. एवढेच नाही, तर त्यांना आपले उत्तराधिकारी नेमले. पू. महाराज हे अत्यंत मितभाषी होते. तथापि प्रवचन, व्याख्यानाच्या वेळी अत्यंत ओघवत्या भाषेत बोलत असत. त्यांच्या शब्दांत देववाणीच्या परतत्त्वाचा एक स्पर्श असे; त्यामुळे सर्वजण, मंत्रमुग्ध होत असत. पू. महाराज म्हणजे ऋजुता व अमानित्वाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांची वृत्ती सदैव अंतर्मुख असे, ते अत्यंत विनम्र असत. ते प्रज्ञावंत होते; त्यामुळे ते शब्दप्रभू होते असे म्हणणे यथार्थ होईल. “अधिकार तैसा करू उपदेश !” प्रमाणे ते साधकांशी संवाद करीत असत. त्यांनी वेळोवेळी जे उपदेश केले होते, त्यात उपासनेबद्दल जे चिंतन व्यक्त झाले आहे, त्याचा मागोवा खालील प्रमाणे; मनुष्याच्या ठिकाणी राग, मत्सर, द्वेष इ. विकार आणि पाप वासनांनी मनुष्याच्या हातून पापकर्मे घडत असतात. तसेच, ज्याचा मन:स्ताप केला जातो, त्यातून विकार निर्माण होतात. हे तर पूर्व कर्माचे फळ असते, त्याने परमार्थ घडत नाही. यासाठी मनुष्याने सद्गुणांचा अंगिकार करावा. मनातील दोष गेले म्हणजे मन:शुद्धी होते. हा ईश्वराचा प्रसाद असतो. तेव्हा साधक, उपासकांनी सदैव उपासना करावी. उपासना करताना संसार सुख मिळावे; म्हणून उपासना करू नये, परंतु उपासना करताना जरी सुख मिळाले, तरी ईश्वराच्या कृपेने मिळाले हे जाणले पाहिजे. तसेच, असे जे संसारसुख असते, ते मुक्तीकडे नेणारे ठरते. याने संसारात, कुटुंबात सुखसमाधान राहते. त्या वेळी उपासनेने परमार्थही साधू शकतो. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांनी “वेदान्त पारिजात सौरभ” नावाचा ग्रंथ लिहिला आहे.श्रीदत्तमहाराज कवीश्वर  यांना भारताच्या चार राष्ट्रपतींच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे. • १९१० : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (माघ वाद्य ६ शके १८३१) (मृत्यू : १ मार्च,  १९९९)घटना :१८५५ : अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.१९०३ : जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.१९६९ : जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.२००१ : बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.• मृत्यू :• १७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म : २४ फेब्रुवारी, १६७०)• १९४९ : प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.  (जन्म : १३ फेब्रुवारी, १८७९ )• १९८६ : मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन. (जन्म : १४ सप्टेंबर, १९३२)• १९९४ : धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.जन्म :१९२५ : चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू : ५ एप्रिल, १९८०)१९३१ : मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म. (मृत्यू : ३ मे २००९)

Share: