निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
युगाब्द : ५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक फाल्गुन ४ शके १९४२सूर्योदय : ०६:५८सूर्यास्त : १८:३८चंद्रोदय : १४:५३चंद्रास्त : ०४:३४, फेब्रुवारी २४शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : माघपक्ष : शुक्ल पक्षतिथि : (जया ) एकादशी - १८:०५ पर्यंतनक्षत्र : आर्द्रा - १२:३१ पर्यंतयोग : आयुष्मान् - ०४:३५, फेब्रुवारी २४ पर्यंतकरण : विष्टि - १८:०५ पर्यंतद्वितीय करण : बव - ०६:११, फेब्रुवारी २४ पर्यंतसूर्य राशि : कुंभचंद्र राशि : मिथुनराहुकाल : १५:४३ ते १७:११गुलिक काल : १२:४८ ते १४:१६यमगण्ड : ०९:५३ ते ११:२०अभिजितमुहूर्त : १२:२५ ते १३:११दुर्मुहूर्त : ०९:१८ ते १०:०४दुर्मुहूर्त : २३:३४ ते ००:२३, फेब्रुवारी २४वर्ज्य : ००:५४, फेब्रुवारी २४ ते ०२:३३, फेब्रुवारी २४"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव : निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत.या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोगातून शांतता'प्रसाराचे काम सु्रू केले.त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे. 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली. निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.• २०११ : सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म : २१ मार्च १९२३)घटना :१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.१७३९: चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.१९९६ कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.• मृत्यू :• १९६९ : चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म : १४ फेब्रुवारी १९३३ - नवी दिल्ली)• १९९८ : क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म : २ जानेवारी १९६०)• २००० : वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.• २००४ : केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म : २४ ऑगस्ट १९१८)• २००४ : हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. (जन्म : २२ जानेवारी १९३४)जन्म :१९१३ : जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू : ६ जानेवारी १९७१)१९५७ : तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू : २ नोव्हेंबर २०१२)१९६५ : मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू : २६ नोव्हेंबर २००८)